शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

मुंबईकरांसाठी खुशखबर, मोडकसागर पाठोपाठ तानसाही ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 7:30 PM

मुंबईच नव्हे तर तलाव परिसरातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खुशखबर आणली आहे. मोडक सागर तलावपाठोपाठ दोनच दिवसात तानसा तलावही भरून वाहू लागला आहे

ऑनालाइन लोकमतमुंबई, दि. 18 - मुंबईच नव्हे तर तलाव परिसरातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खुशखबर आणली आहे. मोडक सागर तलावपाठोपाठ दोनच दिवसात तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वच तलावांमध्ये एकूण २७४ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे.यावर्षी पावसाने मुंबईत लेट एन्ट्रीनंतरही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईचे पाणी टेन्शन यंदा संपणार आहे. मुसळधार पाऊस सतत तलाव परिसरात बरसात असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी भरून वाहू लागला होता. तर अन्य प्रमुख तलावांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यावेळी तानसा तलावही काठोकाठ भरण्याच्या मार्गावर होता.त्याप्रमाणे आज संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा दुसरा मोठा तलाव आहे. या तलावातून दररोज मुंबईत सुमारे ५३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य तलावांमध्ये मिळून दहा लाख २८ हजार दशलक्ष लिटर जमा झाला आहे.मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे. मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर्स पाणीपुरवठा होतो.मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलक्ष लीटर्स एवढी आहे.दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.

या तारखेला तलावांमध्ये एकूण जलसाठा (आकडे दशलक्ष लिटर्समध्ये )२०१७- दहा लाख २८ हजार ४१५२०१६- सात लाख २६ हजार ३५५२०१५-दोन लाख ७२हजार १६०