शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तानशेत, उंबरमाळीत लोकलमध्ये चढणे झाले धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:45 AM

कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून....

भातसानगर : कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून येथून गाडीत चढउतार करणे, ही तारेवरची कसरतच ठरत आहे.अनेक वर्षांपूर्वीपासूनची ही स्थानके असून येथे फलाटच नाही. तर, प्रवाशांना रेल्वेत चढउतार करण्यासाठी धक्का तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तोही अनेक ठिकाणी तुटल्याने त्यात पाय अडकून पडण्याच्या आणि कधी रेल्वेखाली जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, या कठड्याला असणारा मातीचा भराव पावसाने वाहून गेल्याने कठड्यावर चढणेही धोक्याचे झाले आहे. तानशेत आणि उंबरमाळी या स्थानकांवर रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच काळजीपूर्वक उतरावे लागत आहे. जर का चढताना, उतरताना तोल गेला, तर रेल्वेखाली जाण्याची भीती आहे. या स्थानकांवरून शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून दररोज असा प्रवास करत असतात.या स्थानकांसाठीच्या सुविधांसाठी अनेकदा मागणी करूनही ती स्थानके तोट्यात असल्याच्या कारणाखाली त्यांना सुविधा मिळत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी फायद्यात असलेल्या स्थानकांचा निधी जर येथे वापरला, तर निरपराधांचे जीव तरी वाचतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकांसाठीचा विकास व्हावा, यासाठी प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हवे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे संघटनांचे पदाधिकारी सांगतात.यासंदर्भात रेल्वे अधिकाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे स्थानक तोट्यात असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुविधा देता येत नाही. त्या द्यायच्या म्हटल्यास रेल्वेवर त्याचा बराच ताण पडतो. त्यामुळे त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही संघटनेच्या माध्यमातून या स्थानकांच्या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत असून माजी खा. सुरेश टावरे यांच्या कारकिर्दीत निदान हे कठडे तरी झाले. मात्र, इतर कुणीही त्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत.-शैलेश राऊत, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे