Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:06 PM2021-05-20T20:06:02+5:302021-05-20T20:06:35+5:30

Tauktae Cyclone: पंतप्रधान महोदयांनी वादळाच्या फटका बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करून ते गुजरात राज्याचेच पंतप्रधान आहेत अशा पद्धतीची एक जाणीव या देशाच्या जनतेला त्यांनी करून दिली आहे

Tauktae Cyclone Narendra Modi is the Prime Minister of Gujarat attacks Nana Patole | Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

Next

पालघर दि 20 मे: पंतप्रधान महोदयांनी वादळाच्या फटका बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करून ते गुजरात राज्याचेच पंतप्रधान आहेत अशा पद्धतीची एक जाणीव या देशाच्या जनतेला त्यांनी करून दिली आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पालघर येथील उसरणी गावी केली.

उसरणी येथे तोक्त चक्रीवादळाच्या तडाख्यात मातेश्वरी व लक्ष्मी मैया या दोन मच्छीमार बोटिंग चे खडकावर आपटून फुटून त्यांचे नुकसान झाले होते त्यांच्या पाहणी साठी अस्लम शेख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार हुसेन दलवाई राजेंद्र गावित आमदार राजेश पाटील श्रीनिवास वनगा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय पाटील व अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळेस चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार तसेच किनारपट्टी वरील गावे शेतकरी यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

आमचा दुश्मन देश पाकिस्तान आहे त्याला तुम्ही मोफत लस दिली तुम्ही पाकिस्तानी धार्जिणे झालात का असाही आरोप नाना पटोले यांनी केला लसीकरण अभावी लोक मरत आहेत अशा वेळेस त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर हे काही बरोबर नाही भारतातील जनतेचे अस्तित्व त्याची सुरक्षा त्यांचा जीव महत्त्वाचा आहे नरेंद्र मोदीच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही देशाच्या जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे याच्याकडे त्यांनी लक्ष घालावे त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपदा व्यवस्था बनवण्याचा काम संसदेने केले आहे देशातील राज्याच्या पैसा एनडीआरएफ मध्ये जातो केंद्राकडे मदत मागता असं विरोधी पक्षाकडून बोलले जाते ही केंद्राची जबाबदारी आहे ही राष्ट्रीय आपदा आहे कृत्रिम नाही म्हणून दरवेळेस आम्ही केंद्राकडे पैसे मागतो अगोदर त्यांनी राष्ट्रीय आपदा कायदा वाचून घ्यावा व समजून घ्यावा असेही पाटोळे म्हणाले.

केंद्र सरकारचे लसीच्या बाबतीत नियोजन इतके खराब झालेली आहे की देशातील जनतेस पैसे देऊनही आज लस उपलब्ध होत नाही आज कुठल्याही देशात ज्यांनी ज्यांनी लसीचे उत्पादन केले आहे त्यांनी प्रथम आपल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले आहे जेव्हा स्वतःच्या देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर त्यांनी दुसऱ्या देशात द्यायचे काम केले आहे आपल्या देशात फक्त 10 ते 12 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे आपण बाकीच्या देशात वाटप करू लागलो यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वांनाच अनुभवले आहे आपल्या लोकांचे जिव जात आहेत जगात जास्त मृत्यू हे आपल्या देशात होत आहेत. जगात मोठी महामारी येणार आहे.

आपल्याला पाहिजे तसेच झाले पाहिजे ह्या खाक्या मुळे जनतेस नुकसान सोसावे लागत आहे असे असलम शेख यांनी यावेळेस सांगितले. त्याचप्रमाणे मच्छीमार तसेच वादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टीची पाहणी करून नुकसान झालेल्या मच्छिमार तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना तातडीने मदत जाहीर केले जाईल असेही असलम शेख म्हणाले

Web Title: Tauktae Cyclone Narendra Modi is the Prime Minister of Gujarat attacks Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.