शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

टॅक्सीचालकाला डोंबिवलीत मारहाण

By admin | Published: July 05, 2017 6:09 AM

प्रवाशाची वाट पाहणारे मुंबईतील टॅक्सीचालक हाफिज सिद्दिकी यांना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : प्रवाशाची वाट पाहणारे मुंबईतील टॅक्सीचालक हाफिज सिद्दिकी यांना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्री डोंबिवलीच्या होरायझन हॉलसमोर घडली. मुस्लिम असल्याने मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केल्याने खळबळ उडाली. पण हा वाद गाडीच्या पार्किंगवरून झाला असून त्याला धर्माचा रंग देऊन विपर्यास केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले. सिद्दिकी घाटकोपरहून डोंबिवली पश्चिमेत प्रवासी घेऊन आले होते आणि मानपाडा येथून पुन्हा एअरपोर्टला जाणाऱ्या प्रवाशाची ते वाट पाहात होते. गाडी रस्त्याकडेला लावल्याचा त्यांचा दावा आहे. तेव्हा तेथे मोटारसायकलवरून दोन तरूण आले आणि त्यांनी विनाकारण मारहाण केल्याचे सिद्दिकी यांचे म्हणणे आहे. तेव्हा ते प्रवासी घेऊन मुंबईत गेले. पण दुसऱ्या दिवशी जवळच्या खाजगी रू ग्णालयात उपचार करू न वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले, तेव्हा तेथील पोलिसांनी त्यांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी रात्री मारहाणप्रकरणी अदखलपात्र तक्रार दाखल केली. त्यातील मुस्लिम असल्याने मारहाण केल्याचा सिद्दिकी यांचा आरोप काब्दुले यांनी फेटाळला. गाडी पार्क करण्यावरू न बाचाबाची होऊन मारहाण झाली असावी. तसेच त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करायला हवा होता, असे मत मांडले. आम्ही त्यामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात काहीही सापडले नाही, काब्दुले म्हणाले.पार्किंगवरून वादमुस्लिम असल्यानेच आपल्याला दोन दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी तो फेटाळला आहे. पार्किंगवरून वाद झाला आहे. तो त्याला धर्माचा रंग देऊन विपर्यास करत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काब्दुले म्हणाले.