ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे, पीक नुकसानीचे पंचनामे १५ दिवसांत पूर्ण करणे, भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरूस्ती सुरू करणे आदी आश्वासने मिळाल्यामुळे निलेश सांबरे व त्यांच्या कोकण विकास मंचने येथे सुरू केलेले उपोषण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार संपुष्टात आणले.टीडीसी बँकेतील भरती अवैधरित्या सुरू आहे, बँकेने नियमबाह्यरित्या पदोन्नती दिल्या आहेत. त्यांना स्थगिती मिळून चौकशी व्हावी, टीडीसीचे विभाजन व्हावे, भिवंडी वाडा मनोर रस्त्याची दुरूस्ती व्हावी, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केले जावेत या मागण्यांसाठी हे उपोषण गुरूवारपासून सुरू होते. उपोषणकर्त्यांनी कँडल मार्चही काढला होता. शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना लक्ष घालून कारवाई करण्याचे पत्रही दिले होते. खासदार चिंतामण वनगा, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होतो. त्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांची यासंदर्भात सोमवारी दुपारी २ वाजता बैठक आयोजित केली होती. तिला भिवंडी कल्याण उल्हासनगरचे प्रांत, डीडीआर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती असे ठरले की, नाबार्डच्या मंजुरीनुसार जिल्हा बँक विभाजनाचा प्रस्ताव दोन महिन्यात शासनातर्फे सादर करण्यात यावा, जिल्हा बँकेतील भरती पारदर्शकरित्या व नियमानुसार व्हावी, यासाठी जिल्हा निबंधक शहाजीराव पाटील यांनी व बँकेतील पदोन्नती पारदर्शकतेने व्हावी यासाठी विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी देखरेख करावी, भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता कापडणीस यांनी दिली तर माणकोली महामार्गाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून १५ दिवसांत शेतकºयांना भरपाई दिली जाईल. असे या तीनही उपविभागीय अधिकाºयांनी स्पष्ट केल. ही बैठक जवळपास २ तास चालली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. जिल्हा बँक विभाजनाचा मुद्दा आपण कॅबिनेटच्या बैठकीत तातडीने उपस्थित करू, व प्रक्रिया पूर्ण करवून घेऊ, असे त्यांनी सांगितले व जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयांचीही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या आवाहनानुसार हे उपोषण संपुष्टात आले.हा जनतेचा विजय-निलेश सांबरेमी आणि कोकण विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मागण्यांसाठी उपोषण केले. त्या मान्य झाल्या हा जनतेचा विजय आहे. आता त्या प्रत्यक्षात कशा पूर्ण होतात याकडे लक्ष देऊ - निलेश सांबरेसारे पारदर्शकच, स्थगिती नाहीठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रिया जी कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही, जिच्या कार्यपद्धतीबाबत कोणतेही वाद नाहीत तिच्यामार्फत नियमानुसार सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कशाचेही भय नाही. पदोन्नतीची यापूर्वीही चौकशी झाली आहे आणखी झाली तरी आमची हरकत नाही. बँकेचे विभाजन व्हावे ही आमचीही भूमिका आहे. भरती आणि पदोन्नतीला कुणीही कसलीही स्थगिती दिलेली नाही.-राजेंद्र पाटील, चेअरमन टीडीसी बँक
टीडीसी बँक विभाजन प्रस्ताव २ महिन्यात, सांबरेचे उपोषण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 4:11 AM