- सुरेश लोखंडेठाणे : यंदा खरीप हंगामाच्या पीककर्जापोटी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने १८० कोटी रुपये कर्जाची तरतूद केली असून त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आहेत. यातील ५७ कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज या दोन्ही जिल्ह्यांतील ११ हजार २४७ शेतकºयांच्या खात्यात जमा झाल्याच्या वृत्तास टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दुजोरा दिला.खरीप हंगामाच्या बी-बियाण्यांसह शेतीची विविध कामे, पेरणी, औषधफवारणीसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी या पीककर्जाचे वाटप शेतकºयांना होत आहे. बहुउत्पादन भातासाठी हेक्टरी ६० हजार रुपये, तर नागलीच्या पिकासाठी हेक्टरी ३५ हजार रुपये पीककर्ज शेतकºयांना मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत शेतकºयांना या कर्जाचा लाभ घेता येईल. तरीदेखील आतापर्यंत ११ हजार २४७ शेतकºयांनी सुमारे ११ हजार २२ हेक्टर क्षेत्रावर या पीककर्जाचा लाभ घेतला आहे. या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करावी.
शेतकऱ्यांसाठी टीडीसीसीचे १८० कोटींचे पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:24 AM