ठाणे : राज्यातील जिल्हा बँक म्हणून प्रसिध्द असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला वर्षभरात ३० कोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे मंगळवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उघड केले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील तरूणांना नवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासह कृषी विकासासाठी जिल्ह्यातील कृषी अभ्यासक शेतकऱ्यांना लवकरच इस्रायल देशात पाठवण्याचे सुतोवासही त्यांनी यावेळी केले.येथील गडकरी रंगायतन येथे बँकेची वार्षिक सभा आज पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदार कपील पाटील यांच्यासह खासदार राजेंद्र गावीत, आमदार किसन कथोरे, संजय केळकर, पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे, विलास तरे आदीं आमदारांसह बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, माजी खासदार बाळीराम जाधव, बँकेचे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर उपस्थित होते. बँकेच्या सहा हजार २६२ कोटींच्या ठेवी असून त्यात वर्षभरात दोन हजार २५ कोटींची वाढ केल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये बँक आग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभरात बँकेच्या नवीन ११ शाखा सुरू करण्यात आल्या. या पुढे आदिवासी, दुर्गम भागात प्राधान्याने शाखा सुरू करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे पाटील यांनी नमुद केले. यावेळी खासदार पाटील यांनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांना वळवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या भाजीपाल्यामुळे केमीकल पोटात जाणार नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. दूध, भाजीपाला आदी नाशिक, नगर आदी भागातून येतो. त्याला येथे आणून विकणे परवडते. मग आपल्या शेतकऱ्यांना का परवडत नाही. असा प्रश्न करून शेतकºयांना यासाठी बँकेने प्रोत्साहित करण्याची गरज असल्यचे पाटील यांनी सांगितले.या बँकेचे ११ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले आर.सी.पाटील यांनी शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत देण्याचा ठराव मांडला. याशिवाय जिल्ह्यातील शेती, माती, रेती मच्छीमारी संपली असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन टक्के व्यापमाफी देण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी ठाणे, पालघरच्या उपस्थित नागरिकांनी त्यांच्या सूचना मांडून त्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले.
टीडीसीसीला ३० क८ोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा; शेतकऱ्यांना इस्रायलला पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:03 PM
बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे पाटील यांनी नमुद केले
ठळक मुद्देकृषी विकासासाठी जिल्ह्यातील कृषी अभ्यासक शेतकऱ्यांना लवकरच इस्रायल देशात पाठवणारबँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतनबँकेच्या सहा हजार २६२ कोटींच्या ठेवीवर्षभरात ३० कोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा