शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पनवेलचा टीडीआर ठाण्यात; तर कल्याणचा मुंबईत वापरण्यास मुभा, २०३० पर्यंत एमएमआर झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य; झोपड्यांचा समूह घोषित करणार

By अजित मांडके | Published: September 04, 2024 12:44 PM

Thane: मुंबई महानगर प्रदेश २०३० पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एमएमआर क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचे क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाचवेळी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे.

- अजित मांडकेठाणे - मुंबई महानगर प्रदेश २०३० पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एमएमआर क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचे क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाचवेळी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सध्या एमएमआर क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये तयार होणारा टीडीआर केवळ त्याच महापालिका, नगरपालिका क्षेत्रात न वापरता संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वापरण्यास मुभा देण्याचा प्रस्ताव आहे. 

अविकसित भागातील टीडीआर विकसित भागात वापरण्यास परवानगी दिली तर झोपडपट्टी पुनर्विकासाला चालना मिळेल, असे विकासक, वास्तुविशारद यांना वाटते. बांधकाम क्षेत्रातील विकासकांनी टीडीआर खरेदी करताना किमान २० टक्के स्लम टीडीआर खरेदी करावा, अशी सक्ती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरातील विकासाला चालना देण्यासाठी मित्र संघटनेला कार्यशाळा आयोजित करण्यास सांगितले आहे. त्याचे सादरीकरण १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. 

 

पुनर्विकासास गती येईलसूत्रांनी सांगितले की, एमएमआर क्षेत्रातील झोपडपट्टीचे क्लस्टर करून हे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र ३(क) घोषित केले तर झोपडपट्टी पुनर्विकासाला गती प्राप्त होईल. एमएमआर क्षेत्रात आठ पालिका, आठ नगरपालिका, एक ग्रामपंचायत आहे. ज्या पालिका क्षेत्रात जो स्लम टीडीआर तयार होतो तो त्याच पालिका क्षेत्रात वापरण्याची मुभा आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या तुलनेत अंबरनाथ, कल्याण, पनवेल येथे जमिनीचे दर कमी आहेत. तेथे निर्माण होणारा टीडीआर तेथे वापरला जात नाही. त्यामुळे पनवेलमध्ये निर्माण झालेला एक हजार चौ.फू. टीडीआर ठाण्यात वापरायला परवानगी दिली तर टीडीआरच्या दरातील फरकामुळे कदाचित १५० ते २०० चौ.फू. इतकाच होईल; परंतु निदान तो वापरला जाईल. 

एसआरए कार्यालयात आढावा सर्वांसाठी घरे व २०३० पर्यंत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टीमुक्त करण्याबाबत आराखडा मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केला जाणार आहे. सध्याचे प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्पांचा ठाण्यातील एसआरए कार्यालयात आढावा घेण्यात आला.  मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले. ‘झोपू’ योजना आता कल्याण, मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्येही राबविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणे