शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

शिक्षकाचा पुढाकार; लोकवर्गणीतून उभारली भव्य शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 7:07 PM

भिवंडीतील मालोडी जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उदघाटन...

भिवंडी - सध्या इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळांमुळे जिल्हा परिषद व शासकीय शाळा पटसंख्येत मागे पडत आहेत. असे  असतानाच जिल्हा परिषदेच्या एक वर्ग खोलीची शाळा बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने मान्यता दिल्यानंतर, शाळेतील शिक्षकाने पुढाकार घेत लोकवर्गणीतून सुंदर व सुबक एक मजली शाळा उभारली. या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व वर्ग खोल्यांच्या भिंतींवर सुंदर चित्र रेखाटले आहेत. (Teacher initiative; A magnificent school built With the participation of the people)

या शाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार शांताराम मोरे, जिप उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला .

भिवंडी तालुक्यातील मालोडी या गावात जिल्हा परिषदेने एक वर्ग शाळा मंजूर केली होती. परंतु या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर काठे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकवर्गणी एकत्र करीत शाळा एकमजली बनविण्याचा निर्णय घेऊन न थांबता तो संकल्प तडीस नेला. तसेच या शाळेच्या वर्गखोल्यात अभ्यासपूर्ण चित्र रंगवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांची सर्वच ग्रामस्थांसह मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोनिका चौधरी व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, तर मान्यवरांच्या हस्ते शिक्षक ज्ञानेश्वर काठे यांचा गौरव करण्यात आला .

सध्याच्या कोरोना काळात मागील दीड वर्ष शाळा बंद असतानाही शिक्षकांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्याच बरोबर या शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर काठे यांनी शाळा इमारत घडविण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांचा उचित सन्मान, समाजा सोबतच शासनानेही करणे गरजेचे आहे.अशा ध्येयवेड्या शिक्षकांमुळेच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.  

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी