लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नेरुळ येथील एका १४ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाºया जनाजी क्षीरसागर (४८, रा. नवी मुंबई) या खासगी क्लासच्या शिक्षकाला तीन वर्ष सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षाही सुनावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नेरुळ, सीवूडस भागात राहणारी ही पिडित मुलगी २०१५ मध्ये नववीच्या वर्गात शिकत होती. ती त्यावेळी नेरुळ येथील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी जात होती. १२ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान क्षीरसागर या शिक्षकाने तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तिने या क्लासला जाणेच बंद केले होते. तिने घाबरुन हा प्रकार घरी सांगितला नव्हता. मात्र, २७ जानेवारी २०१५ रोजी पुन्हा तिच्या आईने तिला क्लासला जाण्याचा आग्रह केला. त्यावेळी तिने आधी क्लासमध्ये घडलेला ‘प्रकार’ सांगितला. याचा जाब तिच्या पालकांनी या शिक्षकाला विचारल्यानंतरही या त्याने तिचा २७ जानेवारी रोजीही पुन्हा विनयभंग केला. अखेर याप्रकरणी तिच्या पालकांनी नवी मुंबईच्या एनआरआय या सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि विनयभंगाचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बेंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास केला. याच खटल्याची सुनावणी १ मार्च रोजी ठाणेन्यायालयात झाली. आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील वर्षा चंदने यांनी जोरदार बाजू मांडली. चार साक्षीदार यावेळी तपासण्यात आले. सर्व बाजू तपासून ठाणे न्यायालयाने आरोपी शिक्षकाला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:41 PM
नेरुळ येथील एका १४ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाºया जनाजी क्षीरसागर (४८, रा. नवी मुंबई) या खासगी क्लासच्या शिक्षकाला तीन वर्ष सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी सोमवारी सुनावली.
ठळक मुद्देदहा हजार रुपये दंडाचीही शिक्षा