ठाणे : गाजावाजा करून मागील वर्षी जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. मात्र, त्यानुसार अजूनही त्या झालेल्या नाहीत. रखडलेल्या या बदल्यांमधील अर्जांत शिक्षकांना दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. यावेळी पात्र ठरणाऱ्या नवीन शिक्षकांनादेखील अर्ज करण्याची सक्ती केली आहे.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी गुरुवारी या बदल्यांचा आदेश जारी केला. त्यात ठाण्यासह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शिक्षकांना याआधी आॅनलाइन भरलेल्या अर्जांत दुरुस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली आहे. यात नव्याने पात्र ठरणाºया शिक्षकांनादेखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त होणाºया माहितीपत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्वरित देण्याची सक्तीदेखील शिक्षण विभागावर करण्यात आली आहे. यामुळे त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. यानुसार, पात्र ठरलेल्या शिक्षकांनी २०१७-१८ करिता अर्ज दाखल केले. मात्र, त्या बदल्या अद्याप झालेल्या नाही. यावेळी पात्र ठरलेल्या व अर्ज केलेल्या शिक्षकांसह नव्याने पात्र ठरणाºया शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी म्हणजे मे २०१९ या कालावधीत होणार आहेत. या बदल्या ३१ मे २०१९ पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन केल्या जाणार आहेत.पात्र शिक्षकांना यादी मिळणार; ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फॉर्मच्बदलीस पात्र असलेल्या व नव्याने पात्र ठरलेल्या शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षात नवीन शाळेवर हजर होता यावे, या दृष्टीने संबंधित शिक्षकांना ५ डिसेंबरपासून आॅनलाइन फार्म भरता येतील.च्याशिवाय, जुन्या शिक्षकांना फॉर्ममध्ये बदल करता येतील किंवा तो रद्द करून नवीन फॉर्म भरता येणार आहे. याद्वारे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांच्या या बदल्या होणार आहेत.च्या बदल्यांच्या दृष्टीने शिक्षकांना सर्व रिक्त पदांची माहिती दिली जाईल. याशिवाय, बदलीस पात्र ठरणाºया शिक्षकांची यादीदेखील संबंधितांना उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून शिक्षकांना त्यांचे अर्ज रिक्त पदास अनुसरून भरता येणे शक्य होईल.