अंबरनाथ : अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांची शाळेबाहेरच फ्री स्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याने त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात प्रियदर्शिनी हिंदी शाळा आहे. या शाळेत अनिता गुप्ता या २९ वर्षापासून शिक्षिकेचे काम करतात. २९ जानेवारीला अनिता यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना पीटीच्या तासासाठी बाहेर खेळण्यासाठी सोडले असताना शिक्षक एकादशी राम यांनी या मुलांचा व्हिडीओ काढला. नंतर शाळा सुटल्यावर अनिता या शाळेबाहेर पालकांशी बोलत असताना एकादशी हे गाडीवरून तिथे आले आणि त्यांनी आपल्याला बोलावत आपल्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप अनिता यांनी केला.
कानशिलात लगावलीयावरूनच अनिता यांनी एकादशी यांच्या कानशिलात लगावली. यानंतर दोन्ही शिक्षकांमध्ये शाळेबाहेरच हाणामारी झाली. याआधी मुख्याध्यापकांनी अनिता यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. तसेच शाळा सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात असल्याचा आरोपही अनिता गुप्ता यांनी केला.
दोघांविरोधात गुन्हा दाखलअनिता यांचे हे आरोप एकादशी राम यांची पुतणी अंजली जैस्वार यांनी फेटाळले आहेत. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मारहाणीत अनिता यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात एकादशी राम आणि अंजली जैस्वार यांच्याविरोधात विनयभंग, दुखापत करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.