ठाणे : जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ या पूर्वी लागलेल्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक १५ मेला शहापूर ते मुबंई विराट पायी मोर्चा काढणार, असा इशारा मुख्यमंत्र्या नावे असलेल्या पत्राव्दारे ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना देण्यात आला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शिक्षकांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन देऊन मोर्चाचा इशारा शनिवारी दिला .यावेळी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ , शिक्षक सेना पदाधिकारी , कला अध्यापक संघ , शिक्षकेतर कर्मचारी संघटना ,कार्स्टाईब संघटनांचे कला क्र ीडा संघटना , पदाधिकारी व कोकण विभाग शिक्षक सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे , विजय राणे, माधव पाटील , दिगंबर बेंडाळे, सुधीर देशमुख शिरसीकर मँडम, शांतीलाल डोंगरे, दिपक दिनकर व अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते........
जुन्या पेन्शनसाठी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा शिक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 7:54 PM
नोव्हेंबर २००५ या पूर्वी लागलेल्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक १५ मेला शहापूर ते मुबंई विराट पायी मोर्चा काढणार, असा इशारा मुख्यमंत्र्या नावे असलेल्या पत्राव्दारे ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना देण्यात आला
ठळक मुद्देशिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीशिक्षक १५ मेला शहापूर ते मुबंई विराट पायी मोर्चा काढणार उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन देऊन मोर्चाचा इशारा