लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी कल्याणच्या आधारवाडी येथील स्पोटर््स क्लबमध्ये सुरू केलेल्या विनामूल्य जलतरण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते झाले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे शिबिर ३० मेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान चालणार आहे.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर मोरेश्वर भोईर, महिला बालकल्याण सभापती वैशाली पाटील, गटनेते रमेश जाधव, वरुण पाटील, नगरसेवक सुधीर बासरे, कल्याण स्पोटर््स क्लबचे कंत्राटदार दिलीप गुढखा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी देवळेकर म्हणाले की, जलतरण हा व्यायामाचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पोहण्याची आवड निर्माण करण्यासाठी हे शिबिर भरवले आहे. केडीएमसीचे तरणतलाव आॅलिम्पिक दर्जाचे आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने ते उभारले आहेत. जास्तीतजास्त मुलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, या शिबिरात १० ते १५ वयोगटांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होता येईल. प्रशिक्षणासाठी शाळेचे ओळखपत्र आणि पालकांचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
विद्यार्थी गिरवताहेत जलतरणाचे धडे
By admin | Published: May 11, 2017 1:49 AM