शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पथकप्रमुख बदलले, परिस्थिती जैसे थे

By admin | Published: February 03, 2016 2:10 AM

पदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली

प्रशांत माने,  डोंबिवलीपदपथ, महत्वाचे चौक आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ठोस कारवाईची मोहीम सुरू केली असताना अचानक सोमवारपासून ही कारवाईची मोहीम थंड पडली आहे.पथकप्रमुख बदलले परंतु परिस्थिती जैसे थे राहील्याने फेरीवाल्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन नमले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नावर वारंवार महासभेतही लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जातो. लक्षवेधी मांडून केडीएमसी प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आणला गेला आहे. परंतु, आयुक्तपदी ई रवींद्रन हे विराजमान होताच रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून त्याअंतर्गत कल्याण डोंबिवलीत जोमाने कारवाई सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात डोंबिवलीत रामनगर प्रभागाचे स्थानिक नगरसेवक तथा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतली होती. यात त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला होता. प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही याबाबत हळबे यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. यावर प्रशासनाने ग प्रभागाचे फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख संजय साबळे यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी रमाकांत जोशी यांची नेमणूक केली. परंतु, पथकप्रमुख बदलून देखील परिस्थिती जैसे थे च राहीली असून वास्तव पाहता फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरणारे हळबे आणि नवनियुक्त पथकप्रमुख जोशी गेले कुणीकडे? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)