ठाणे : निवडणूक आचारसंहितेत तेजस्विनी बस अडकणार असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून एकच बस ताफ्यात घेऊन तिचा लोकार्पण करण्याचा प्रताप बुधवारी सकाळीच करून पुढील आठवडाभरात आणखी १० बस सेवेत दाखल होतील, असा दावा केला. हे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले. तब्बल दोन वर्षांपासून या बस प्रतीक्षेत होत्या.शासनाकडून या बसच्या खरेदीसाठी ६ कोटींचे अनुदान मिळाले असून निविदा प्रक्रि यादेखील पूर्ण झाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना ३०० तेजिस्वनी बस मिळणार आहेत. त्यापैकी ५० बस ठाण्याच्या वाट्याला येणार आहेत. तब्बल दोन वर्षांचा खडतर प्रवास या बसला करावा लागला आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यातील ३०० बस रस्त्यावर धावतात. शहराची लोकसंख्या आता २४ लाखांच्या घरात असून त्यामानाने परिवहनच्या बस अपुºया पडत आहेत. त्यात महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने खास महिलांसाठी या बस चालवण्याचा निर्णय घेतला होता.>महिला सुरक्षेनुसार बसची रचना : महिलांच्या सुरिक्षतेतसाठी या बसची रचना करण्यात आली आहे. या बसमध्ये वाहन चालक जरी पुरुष असले तरी वाहक मात्र महिला असणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली तसेच पॅनिक बटनदेखील असणार आहे. या बस कोणत्या रूटवर चालणार हे अजून निश्चित झाले नसले तरी गर्दीच्या ठिकाणीच सुरु वातीला ती चालवण्याचे परिवहन प्रशासनाचे नियोजन आहे.>५० बस मिळणारसप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बसेस दाखल होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, तिसºया आठवड्यात केवळ एक बस दाखल झाली असून आठवडाभरात १० आणि एका महिन्यात सर्व ५० बस दाखल होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांनी आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून त्यापूर्वीच घाईत एका बसचे उद्घाटन केल्याने तिचा फायदा किती महिलांना होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
अवघ्या एका बसने केला ‘तेजस्विनी’चा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:24 AM