ठाणे : गेल्या काही ठाण्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हवेतील गारवा नाहीसा झाला असून रात्रीचे तापमान देखील ३० ते ३५ अंश सेल्सीअस एवढे आहे. तर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील तापमान हे ३९ अंश सेल्सीअस एवढे असल्याचे दिसून आले आहे. उन्हाचा वाढता पारा हा चिंतेची बाब ठरत असून आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे शहरातील तापमानाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला कधी थंडी तर, उष्णता असा वातावरणाचा खेळ सुरु होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३५ अंश सेल्सियस पार गेले होते. त्यामुळे सकाळी थंडावा तर, दुपारी कडाक्याची उष्णता यांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा लागल्या होत्या. परंतु मागील काही दिवसापासून तापमानात पुन्हा बदल झाल्याचे चित्र आहे. आता सकाळ पासून ते अगदी रात्री पर्यंत तापमानाचा पारा हा चढाच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात शालेय मुलांच्या परिक्षा सुरु झाल्याने त्यांनाही या उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे गुरुवारी दुपारचे तापमान हे ३९ अंश सेल्सीअस पर्यंत गेले होते. तर सकाळचे तपमान ३५ अंश सेल्सीअस एवढे दिसून आले. दुपारी दीड ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सूर्य चांगलाच तळपताना दिसत आले. त्यामुळे अनेकांची पावले थंड पेय पिण्याकडे वळल्याचे दिसत होते. रसवंती गृहात लोक उसाच्या रसाचा आस्वाद घेतांना दिसून आले. या वाढत्या तापमानाने ठाणेकर नागरिकांनी घर आणि आॅफिस मधील एसीत बसून थंडगार हवेत राहणाने जास्त पसंत केले. वातवरणातील वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
दिनांक - तापमानाची नोंद१४ मार्च -३४१५ मार्च - ३५१६ मार्च - ३२१७ मार्च - ३३१८ मार्च - ३२१९ मार्च - ३४२० मार्च - ३८२१ मार्च -३९