प्रतिक्रिया पाठवतोय....
* आम्हाला इंग्रजी कशी येणार?
पोषण टँकर मराठीत नाही. आम्हा कमी शिकलेलो आहोत. आम्हाला इंग्रजी येत नाही. तरीही आम्हा अंगणवाडी सेविकांकडून पोषण टँकरची माहिती इंग्रजीत भरून घेतली जात आहे. या पोषण टँकरची माहिती आम्ही आमच्या मुला, मुलीकडून, नातेवाईकांकडून भरुन घेत आहोत.
- सुनीता बोंद्रे
अंगणवाडी सेविका, शहापूर
---------
अंगणवाडी केंद्रांची माहीती पोषण टँकरच्या ॲपमधून भरायची आहे. पण या माहितीत लाभार्थ्यांची नावे इंग्रजीत व वजन, उंची मराठीत भरावी लागत आहे. आम्हा कमी शिकलेल्या अंगणवाडी सेविकांना इग्रंजीत नावे शोधण्यासाठी दमछाक होते. इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक नावं वाचता येत नाही. त्यामुळे ही माहिती भरण्यासाठी गावातील शिकलेल्या मुला, मुलीकडून माहिती भरून घेतो. शासनाने पोषण टँकर अँप मराठीत करावे. मराठीत केले नाही तर कमी शिकलेल्या काही अंगणवाडी सेविकांना राजिनामे देऊन घरी बसावे लागेल.
- संगिता केदार
अंगणवाडी सेविका, मुरबाड
-----------
* सीईओ प्रतिक्रिया-
- या पोषण टॅंकरमध्ये काही समस्या होत्या. पण बाय लिंकवर ही माहिती भरण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे. याविषयी महिला व बालकल्याण विभागाकडे अधिक माहिती मिळेल.
- डाॅ. भाऊसाहेब दांगडे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., ठाणे