ठाणे - मुंबई-नाशिक रस्ता (नाशिक लेनच्या दिशेने) टेम्पोने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी खारेगाव टोल नाका येथे घडली. यामध्ये टेम्पोची पुढील दोन्ही चाके निखळली, त्याचबरोबर रस्त्यावर तेल सांडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेल रस्त्यावर पसरल्याने कोंडी झाली नसून ती वाहतुक कासवगतीने सुरू होती, माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मोबीन गफुर कासगर यांच्या मालकीचा टेम्पो सकाळी ठाण्यातून नाशिककडे जात होता. खारेगाव टोल नाक्यावर आल्यावर अचानक टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुभाजकाला जाऊन धडकला. यामध्ये टेम्पोची दोन्ही चाके निखळून पडली होती. तसेच त्या टेम्पो तेल रस्त्यावर पसरले होते. घटनेची माहिती मिळताच,ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह आणि वाहतूक पोलिस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतुक कासवगतीने सुरू झाल्याने तातडीने तेलावर माती पसरविण्यात आली असून मुंबई-नाशिक रस्ता आता सर्व वाहनांसाठी मोकळा झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.