शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी

By जितेंद्र कालेकर | Published: August 04, 2023 11:28 PM

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ठाणे : ठाण्यातील मेट्रो ४च्या कामासाठी पिलरवर गर्डर टाकण्याचे काम सध्या घोडबंदर रोड परिसरात सुरू आहे. याच कामासाठी ठाणे ते घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या वाहनांना ३ ते ११ ऑगस्ट पहाटे ५ पर्यंत बंदी घातल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी दिली.

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी ही वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा येथून वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटामार्गे जातील. तसेच कशेळी, अंजूर फाटामार्गे जातील. त्याचप्रमाणे मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद राहणार असून, ही वाहने गॅमनमार्गे खारेगाव ब्रिज खालून खारेगाव टोलनाका मानकोली, अंजूर फाटामार्गे जातील. तसेच नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेलर, ट्रक आणि टँकर अशा मोठ्या वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे जातील.

या वेळेमध्ये वाहनांना प्रवेश बंदमोठ्या वाहनांना ४ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत प्रवेश बंद केला आहे. असाच बदल ५ ते ११ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये राहणार आहे.

याठिकाणी होणार गर्डरचे कामठाण्यातील मानपाडा येथे गर्डर पी ८५-८६ चे काम करताना मानपाडा ब्रिजखालून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने मानपाडा ब्रिज ते टिकूजिनीवाडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन नीळकंठ ग्रीन सोसायटीमार्गे मुल्ला बाग येथून मुख्य रस्त्याला मिळून पुढे जातील. तसेच कासारवडवली येथे आय गर्डर १८८-१८९चे काम करताना आनंदनगर सिग्नलजवळून सेवा रस्त्याने पुढे कासारवडवली पेट्रोलपंपजवळ उजवे वळण घेऊन मुख्य रस्त्याला मिळून पुढे जातील, असे वाहतूक शाखेने म्हटले आहे. 

टॅग्स :thaneठाणे