ऑनलाइन लोकमतठाणे : वाणिज्य शाखेच्या (13 वी) पहिल्या वर्गासाठी जोशी बेडेकर महाविद्यालयात ऑफलाईन प्रवेश मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून ठाण्यातील 12 विद्यार्थ्यांकडून एक लाख 73 हजार रुपये उकळणा:या निखिल मोरे याला ठाणोनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 7 ऑगस्टर्पयत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
चांगली गुणवत्ता असलेल्या सौरव सरोज या विद्यार्थ्यांकडून वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी 12 हजार रुपये घेतले. वारंवार तगादा लावूनही त्याने त्याला प्रवेश मिळवून मात्र दिला नाही. 3 जून ते 21 जुलै 2016 या कालावधीत त्याने आणखीही 12 विद्याथ्र्याकडून असेच पैसे घेतले. यात काहींकडून दहा तर काहींकडून 15 हजार रुपये घेऊन प्रवेश देण्याचे अमिष त्याने दाखविले. अर्थात,
कोणालाही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने या सर्वानीच एकत्र येत त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. पैसे देण्यास त्याने नकार दिल्यानंतर सर्वानी ठाणो पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंग पाटणकर यांच्याकडेच थेट तक्रार केली. त्यांनी हे प्रकरण ठाणोनगर पोलिसांकडे सोपविले. पोलिसांच्या चौकशीतही तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर त्याला 22 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याने आतार्पयत सुमारे 12 विद्यार्थांकडून एक लाख 73 हजार घेतले. त्यांना महाविद्यालयात प्रवेशही दिला नाही आणि पैसे घेतल्याबाबतच्या पावत्याही दिल्या नाही.
केवळ महाविद्यालयाच्या जवळपास असलेल्या खारटन रोड परिसरात वास्तव्यास असल्याने आपली ह्यआतह्ण ओळख असल्याची त्याने बतावणी करून पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याने आणखी किती मुलांकडून पैसे घेतले, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.