उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये रिपाइंचे शहर अध्यक्ष भगवान भालेराव व ओमी कलानी टीमचे सदस्य आपसांत भिडल्याने तणाव होता. शांततेत मतदान पार पडावे म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. उल्हासनगरच्या माजी महापौर व साई पक्षाच्या उमेदवार आशा इदनानी यांच्या मोटारीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली व मोटारीचे नुकसान केले. उल्हासनगरच्या मतदार यादीत वरप, म्हारळ, आशेळे गावातील शेकडो जणांची नावे आल्याने गोंधळात भर पडली. ज्यांची नावे यादीत नव्हती किंवा ज्यांची केंद्रे चुकलेली होती, त्यांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)मतदान प्रक्रिया सुरळीतकिसननगर, वर्तकनगर भागात तुरळक प्रमाणात बोगस मतदानाच्या तक्रारी करण्यात आल्या, तर कोपरीत दहा ठिकाणी मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने व्होटिंग मशिन लावण्यात आल्याची तक्रार होती. तुरळक घटना वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
उल्हासनगरमध्ये तणाव
By admin | Published: February 22, 2017 4:59 AM