मीरा रोड : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारनोंदणी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ मे रोजी भाजपा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी एकगठ्ठा अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्याने आणि त्याला युवा सेनेच्या पदाधिकाºयांनी हरकत घेतल्याने तणाव निर्माण झाला.मीरा-भार्इंदरसाठी पालिकेच्या रामनगर प्रभाग कार्यालयात अर्ज स्वीकारले जातात. वास्तविक पदवीधर असल्याचे दाखले घेऊन स्वत: अर्जदाराने जाणे अपेक्षित आहे. परंतु नगरसेवक, पदाधिकारी आपापल्या कार्यालयात अर्ज भरून पालिका कार्यालयात देत आहेत.गुरूवारी शेवटच्या वेळेत भाजपाचे काही नगरसेवक, पदाधिकारी छाननी न करताच अर्ज दाखल करत असल्याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाºयांना कळताच ते निवडणूक कार्यालयात आले. वेळ संपलेली असताना अर्ज कसे घेता, असा आक्षेप घेत ते थांबवण्याची मागणी केली. आमच्या ओळखीच्या पदवीधर व्यक्तीने अर्ज आणले तर कसून पडताळणी करता. भाजपाने आणलेले अर्ज पडताळणी न करताच कसे स्वीकारता, असा जाब विचारला. तहसीलदार, निवडणूक अधिकाºयांकडे याची तक्रार करण्यात आली. अधिकाºयांनी शेवटच्या क्षणी आलेले भाजपाचे अर्ज स्वीकारले नाहीत. सुमारे ५०० अर्ज भाजपाने भरले असून ते रद्द करावे, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
पदवीधर नोंदणीवरून तणाव , अर्ज भरण्यावरून गोंधळ; युवा सेनेने घेतली हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:44 AM