शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

एसआरएकडे पाठ

By admin | Published: July 07, 2017 6:26 AM

झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) योजनांना मंजुरी मिळवण्याकरिता ठाणेकरांना आता मुंबईला खेपा मारण्याची गरज नसली तरी येथील झोपडपट्टी पुनर्विकासाकरिता विकासक तयार होत नसल्याने अनेक फायली प्रलंबित आहेत. केवळ एसआरएच्याच नाही तर यापूर्वी शहरात सुरु असलेल्या एसआरडी योजनेच्या फाईलदेखील विकासकांच्या थंड्या प्रतिसादामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ वाटाघाटी आणि पुनर्विकासाची योग्य हमी मिळत नसल्याने या कामांना अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. घोडबंदर येथील ठाणे महापालिकेच्या भाजी मंईडच्या दुसऱ्या मजल्यावर एसआरएचे कार्यालय सुरु झाले. पूर्वी एसआरए मंजुरीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यात सहा ते सात महिन्यांचा कालावधी जात होता. ठाण्यात हे कार्यालय सुरु झाल्यावर योजनांना एक ते दोन महिन्यांत मंजुरी मिळू शकेल, असा विश्वास एसआरएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. पूर्वी ठाण्यात एसआरडीअंतर्गत कामे केली जात होती. त्याअंतर्गत आतापर्यंत पाच योजना मार्गी लागल्या त्यांना ओसीदेखील देण्यात आली आहे. तब्बल ५२३ झोपडीधारकांना या योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. आणखी ४ नव्या योजनांची कामे सुरु असून २२५ चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. एसआरडी बंद झाल्यानंतर एसआरए अंतर्गत काही योजना बदलण्यात आल्या असून त्यामध्ये २६ प्रकल्पांची कामे सुरु असून यामध्ये ७ हजार ७१५ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून ८ योजनांमध्ये अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. यामध्ये ४ हजार ५३४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. परंतु, हे झोपडीधारक आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टीवासीयांमध्ये एकी नसणे हे योजना रखडण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच वाटाघाटी योग्य प्रकारे न होणे, योजना मंजुरीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणे यासह इतर कारणांमुळे या प्रकरणांमध्ये प्रगती नाही. ओसीच्या प्रतीक्षेत २४ योजना अडकल्याएसआरएच्या योजनेत पात्र झालेल्या प्रस्तावांची संख्या १५ असून यामध्ये २८३३ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर मागील तीन महिन्यांत नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या ही १० च्या आसपास आहे. यामध्ये २०३९ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामध्ये नामदेवाडीचे दोन, वाकरवाडी, चिखलवाडी, फुलेनगर, पाचपाखाडी, पारशीवाडी, नागसेनगर, वर्तकनगर आणि शिवाईनगर या १० योजनांचा समावेश आहे. पूर्वी एसआरडी योजनेत ओसी मिळवायची झाली तर त्याचा खर्च कोट्यवधीच्या घरात जात होता. त्यामुळे विकासकांनी इमारती तर बांधल्या. परंतु, ओसीच्या प्रतीक्षेत आजही २४ योजना अडकल्या आहेत. यामध्ये २ हजार ७६५ झोपडीधारकांचे वास्तव्य आहे. परंतु, ही योजना बंद झाली आणि एसआरएअंतर्गत ओसीसाठी विशेष अभय योजना सुरु करण्यात आली. यामध्ये ओसीचा खर्च हा पहिल्या खर्चाच्या केवळ १० टक्केच होता. त्याचा लाभ आता सुमारे १२ योजनांनी घेतला आहे. या योजनांमधील रहिवाशांनी हा खर्च केला आहे. प्रत्यक्षात हा खर्च विकासकाने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता संबधींत विकासकांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील त्यांनी हा खर्च केला नाही तर त्यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एसआरए योजनेचे अधिकारी नितीन पवार यांनी दिला.