शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

शहापुरात महिला काँग्रेसचा थाळीनाद

By admin | Published: January 10, 2017 6:31 AM

नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी शहापुरात ठाणे महिला काँग्रेसतर्फे थाळीनाद करण्यात आला, तर तालुका राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहापूर : नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी शहापुरात ठाणे महिला काँग्रेसतर्फे थाळीनाद करण्यात आला, तर तालुका राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.परांजपेनगर येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष दशरथ तिवरे आणि आमदार पांडुरंग बरोरा यांनी केले. बाजारपेठमार्गे मोर्चा तहसील कचेरीवर आल्यानंतर त्याचे रूपांतर एका छोट्या सभेत झाले.या वेळी प्रदेश सदस्य शिवाजी देशमुख, महिला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, कार्याध्यक्ष संजय निमसे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष विद्या फर्डे, विद्यार्थी रा.काँ. तालुकाध्यक्ष धीरज झुगरे, युवक अध्यक्ष कमलेश अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अविनाश थोरात, अनंत शेलार, कैलाश पडवळ, मनोज विशे, रामू अंदाडे, दत्तात्रेय दिनकर, शिवाजी अधिकारी, विठ्ठल भेरे आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द केल्याने शेतकरी, कष्टकरी आणि मागासवर्गीय यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. शिवाय, जिल्हा बँकेवरही निर्बंध घालण्यात आले. एवढे करूनही दोन महिन्यांत किती काळा पैसा जमा झाला, याचा हिशेब मोदी देऊ शकले नाहीत. या भांडवलशाही सरकारचा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि आपल्या निषेधाचे निवेदन तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना दिले. त्यानंतर, दुपारी ताबडतोब ठाणे जिल्हा महिला काँग्रेसतर्फेयेथील पंचायत समितीजवळ नोटाबंदीविरोधात थाळीनाद करून निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष अपर्णा खाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महिला काँग्रेसचा मोर्चा पंचायत समितीजवळ आला. शिवस्मारकावरील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून थाळीनाद करण्यास सुरु वात झाली. या वेळी महिला प्रदेश चिटणीस चंद्रकला नायडू, सरोज डाकी, करु णा कोल्हे, सुनीता चौधरी, सीमा चटियार, प्रियंका मुंज, पुष्पा चौधरी, राजश्री रणदिवे यांच्यासह माजी खासदार सुरेश टावरे, शहापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष महेश धानके हेही सामील झाले होते. (वार्ताहर)