ठाणे: शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेते बालव्यंगचित्रकार प्रथम क्रमांक साईल धुरी, द्वितीय क्रमांक आरुष जैन, तृतीय क्रमांक सुजल पवार, उत्तेजनार्थ यश जोष्टे, गायत्री एकावडे, आस्था तलरेजा, मिलिंद साहू, प्राची पवार, मैथिली सोनावणे, हौशी तरुण व्यंगचित्रकार प्रथम क्रमांक पूर्वा कुबल, द्वितीय क्रमांक धनश्री अभंग, तृतीय क्रमांक अनुभूती जैन, उत्तेजनार्थ मनाली प्रधान, राई राणे, हौशी जेष्ठ व्यंगचित्रकार प्रथम क्रमांक डॉक्टर अभिजित त्रैलोक्य, द्वितीय क्रमांक तनिशा प्रधान, तृतीय क्रमांक. सुभाष बिडकर यांनी पटकावला.
स्पर्धेचे हे सहावे वर्ष होत, यावर्षी एकूण ११७ प्रवेशिका आल्या होत्या, यात बालव्यंगचित्रकार, तरुण हॊशी व्यंगचित्रकार आणि जेष्ठ हौशी व्यंगचित्रकार सहभागी झाले होते. स्पर्धेच परीक्षण जेष्ठ अर्कचित्रकार सतीश खोत, रांगोळीकार आणि कलाप्रशिक्षक महेश कोळी, चित्रकार शैलेश साळवी आणि कमर्शियल आर्टिस्ट विकास फडके यांनी केले. या व्यंगचित्रकला स्पर्धा २०१९ मधील परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री १० वा पर्यंत ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित केले होते, लोकाग्रहास्तव हे प्रदर्शन २५ जानेवारी पर्यंत सायंकाळी ६.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी आयोजित केला होता. या वेळी उपस्थित जेष्ठ व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी गेली ६ वर्ष ही व्यंगचित्रकला स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत असल्या बद्दल शिवसेवा मंडळाचं विशेष कौतुक केले. तसेच, या आणि अशा स्पर्धांसाठी स्पर्धेआधी एखादया कार्यशाळेच आयोजन करण्याचं मंडळाला आवाहन केलं आणि त्यात ते स्वतः इतर व्यंगचित्रकारांसोबत मार्गदर्शन करतील याचीही ग्वाही दिली, या वेळी बोलताना त्यांनी या स्पर्धेतील बालव्यंगचित्रकारांचं विशेष कौतुक केले आणि उपस्थित पालकांना या लहान चित्रकारांना प्रोत्साहन देण्यास सांगितले. तसेच कोपरी परिसरातील ठाणे महानगरपालिका खुले कलादालनाच कौतुक करताना आणि जेष्ठ चित्रकार महेश कोळी यांनी हे कलादालन आजही उत्तमरीत्या मेंटेन ठेवल्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक केले, असे कलादालन जर आपणास मुंबईत उपलब्ध झाले तर ते आणि त्यांचा चित्रकार मित्र परिवार याचा उत्तम उपयोग नक्की करतील असेही सांगितले. ठाणे परिसरातील सर्वच कलाकारांनी आपल्या चित्र प्रदर्शनासाठी या सूंदर कलादालनाचा वापर करावा असे आवाहन केले. या वेळी उपस्थित अर्कचित्रकार तसेच या स्पर्धेचे परीक्षक सतीश खोत यांनी मंडळाचे कौतुक करतांना मंडळाला त्यांनी स्वतः चितारलेल बाळासाहेब ठाकरे यांच अर्कचित्रं भेट दिले. या स्पर्धेचे परिक्षक चित्रकार शैलेश साळवी आणि विकास फडके यांनी मार्गदर्शन करताना परीक्षकांची या स्पर्धेसाठीची भूमिका समजवून सांगितली व यापुढील स्पर्धेत परीक्षकांना काय अपेक्षित आहे हे समजवून सांगितले.
या वर्षीच्या विजेत्या व्यंगचित्रकारांना नामवंत चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या तर्फे त्यांनी चितारलेले "स्वभावंचित्रे" विशेष पारितोषिक म्हणून देण्यात आले. या वेळी कुर्ला बैलबाजर येथील शेठ आय एच भाटिया हायस्कुल शाळेने या स्पर्धेसाठी सर्वाधिक प्रवेशिका पाठवल्या बद्दल या शाळेच्या कलाशिक्षिका मंजुला साळगावकर यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले तर आभारप्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश राजे यांनी केले.