शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

विधानसभेसाठी ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये आघाडीत जुंपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:39 PM

इच्छुकांची भाऊगर्दी : काँगे्रस-राष्ट्रवादीत अनेक दावेदार

ठाणे : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. दुसरीकडे मीरा-भार्ईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीने मांडले होते. ते सत्यात उतरल्यास इच्छुकांचे अवासान गळणार असले तरी ही जागा काँग्रेस सोडणार नाही, असा प्रयत्न या निमित्ताने केला गेल्याची चर्चा मात्र ऐकायलामिळत आहे.काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले असून त्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याचे दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढल्याने काँग्रेसला १५ हजार ८८३ मते मिळाली होती. जी त्या आधीच्या निवडणुकीपेक्षाही कमी होती. २०१४ पूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला येथून ३६ हजार २८८ मते मिळून निसटता पराभव झाला होता. परंतु,मागील निवडणुकीत मोदी लाट असल्याने त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, तो मागील निवडणुकीत भाजपने सर केला होता. तर काँग्रेस आणि राष्टÑवादीचे येथे पानीपत झाले होते.आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सचिन शिंदे, रवींद्र आंग्रे, मिलिंद खराडे आदींसह अन्य तीन चार जणांनी उमेदवारी या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. यापैकी कोणाच्या पारड्यात तिकीट जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. परंतु, दुसरीकडे या मतदारसंघात राष्टÑवादी मात्र काँग्रेसच्या आड येणार असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीने काँग्रेसला मीरा भार्इंदरची जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात ठाणे शहर मतदार संघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती.आघाडीत धुमश्चक्रीठाणे विधानसभा राष्ट्रवादीसाठी सोडणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्टÑवादीत धुमश्चक्री उडणार हे निश्चित मानले जात आहे. इच्छुकांची भाऊगर्दी पाहता या जागेसाठी वरिष्ठांवर दबाव आणण्याचे हे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.