ठाणे : दिवा डम्पिंगला मंगळवारी दुपारी अडीच्या सुमारास अचानक आग लागली. ती विझविण्यासाठी पाण्याचा मारा सुरू झाल्याने तिचा धूर शीळ आणि देसाई गावांच्या दिशेने वाऱ्याने जाताना दिसत आहे. येत्या ८ ते १५ दिवसात डम्पिंग बंद झाल्यास महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा भाजपा दिवा शीळ सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी दिली.पावसाळ्यापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात लागलेल्या आगीनंतर मंगळवारी दुपारी दिवा डम्पिंगवरील कच-याला पुन्हा आग लागली. ती आग विझविण्यासाठी मुंब्रा अग्निशमक दलाचे चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांच्याकडून पाण्याचा मारा सुरू झाल्यावर धुराचे साम्राज्य दिव्यात पसरण्यास सुरुवात झाल्याचे दिसत होते.आगीचे धुमसणे सायंकाळपर्यंत सुरू होते. तर, डम्पिंगबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
ठाण्याच्या दिवा डम्पिंगला पुन्हा आग; धुराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 8:33 PM
दिवा डम्पिंगची आग काही थांबता-थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी पुन्हा डम्पिंगवर आग लागल्याने सर्वत्र धुराचे साम्राज पसरले होते.
ठळक मुद्दे येत्या ८ ते १५ दिवसात डम्पिंग बंद झाल्यास महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशाराआग विझविण्यासाठी मुंब्रा अग्निशमक दल दाखल