आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 17 : मालतीबाई रुग्णालयासमोरील एका मोबाइल दुकानातून विविध नामांकित कंपन्यांचे १० लाख १७ हजारांचे ७१ मोबाइल चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.जुन्या मुंबई रस्त्यावरील भरत जैन यांच्या दुकानाचे शटर २० ते २५ वयोगटांतील दोन चोरट्यांनी तोडून आत शिरकाव केला. त्यांनी कपाटातील ७१ मोबाइल लंपास केले. जैन यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी चोरीची फिर्याद दाखल केली.तीन पथकांची निर्मितीया घटनेनंतर पोलिसांनी चार ते पाच संशयितांची चौकशी केली. आरोपींना शोधण्यासाठी उपनिरीक्षक शिरीष यादव आणि प्रशांत आवारे यांची दोन पथके तसेच सायबर सेल अशा तीन पथकांकडून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे - दुकानातून १० लाखांच्या मोबाइल फोनची चोरी
By admin | Published: July 17, 2017 9:49 PM