- सुरेश लोखंडे ठाणे - शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरत असल्याचे उघड झाले आहे.
आधीच्या सरकारने थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त केले आहे. मात्र सतत व नियमित कर्ज भरूनही त्या शेतकºयांना सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी तीन वर्षे कर्ज फेडीची अट घातली होती. त्यामुळे शेतकरी नाराज होते. त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करीत शेतकºयांच्या हितासाठी शिंदे सरकारने तीन पैकी दोन वर्षे नियमित कर्ज फेड करणाºया शेतकºयांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यास अनुसरून पात्र शेतकºयांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे व पालघर जिलहह्यातील २५ हजार शेतकरी या अनुदानाचे लाभार्थी ठरणार आहे.
जिल्ह्यातील २०१९ मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेले आणि नैसिर्गक आपतीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पण नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनाही ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय या शिंदे सरकारने महिन्याभरापूर्वी घेतला आहे. या अनुदानाचा लाभ राज्यभरातील तब्बल १४ लाख शेतकºयांना होणार आहे. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार ९७१ आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रु पये अनुदान मिळवण्यासाठी २०१७ पासून तीन वर्षे नियमित कर्जफेड केलेली असावी, अशी अट आधीच्या सरकारने ठेवलेली होती. आता या सरकारने तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत कर्जाची नियमित पूर्ण परतफेड केली असेल तरीही अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. यादरम्यान एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केले असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील तीन वर्षांचे खातेदार व त्यातील पात्र शेतकरी खालीलप्रमाणे.
ठाणे जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी२०१७-१८ - ९७४३- ८३५९२०१८-१९ - ११४२५ - ९६३८२०१९-२० - १०६१५- ८९७१
पालघर जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी-२०१७-१८ - १७९५३- १५०९९२०१८-१९ - २०३३४ - १६९६७२०१९-२० - १८९३४- १५९०२