शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ठाणे : दडविलेल्या बारबालांसह ४७ जणांना अटक

By admin | Published: October 28, 2015 11:21 PM

येथील सिडको बसथांब्याजवळील ‘मधुर मनीष रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’वर परिमंडळ-१ ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून नऊ

ठाणे : येथील सिडको बसथांब्याजवळील ‘मधुर मनीष रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’वर परिमंडळ-१ ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून नऊ बालांसह ४७ जणांना अटक केली. तर, मुंब्य्रातील हुक्का पार्लरमधून ६५ जणांना अटक केली आहे.‘मधुर मनीष’ बारमध्ये विहित वेळेपेक्षा जास्त वेळ महिला वेटर सर्व्हिस ठेवल्याबाबत तसेच अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्तांच्या पथकाने २७ आॅक्टोबर रोजीच्या मध्यरात्री १२ ते १ वा.च्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी तेथील मुली ग्राहकांशी अश्लील वर्तन करताना तसेच कागदी बनावट नोटांचा चलनी नोटांप्रमाणे वापर करीत असल्याचे आढळले. या कारवाईत नऊ महिला, पाच पुरुष वादक आणि गायक, ११ पुरुष वेटर, २१ ग्राहक आणि एक बार व्यवस्थापक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंब्रा भागातील चुहा ब्रिजजवळ असलेल्या ‘किंग्ज फॅमिली अ‍ॅण्ड फ्रेण्ड्स ढाबा’ येथे २७ आॅक्टोबर रोजी याच पथकाने छापा टाकून बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्या ६५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र तंबाखूविरोधी अधिनियमानुसार कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.च्या बारमध्ये जादा मुली असल्याचे पोलिसांना समजू नये म्हणून बारचा मालक आणि व्यवस्थापकाने बारमधील हॉलच्या स्वच्छतागृहात तयार केलेल्या एका छुप्या पोकळीत पाच मुलींना दडवून ठेवले होते. च्अत्यंत अरुंद जागेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असतानाही त्यांना असुरक्षितपणे कोंबण्यात आले होते. याप्रकरणीही बारच्या मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. च्दीड महिन्यापूर्वी माजिवड्यातील ‘हनिकाँब’ या बारमध्येही अशाच प्रकार मुलींना दडविल्यानंतर पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई केली होती.