शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

ठाण्यात ५० झाडे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:45 AM

पाचपाखाडी परिसरात प्रशांत धबाले (२६) या तरु णाच्या अंगावर सोमवारी झाड पडून तो गंभीर जखमी झाला.

ठाणे : पाचपाखाडी परिसरात प्रशांत धबाले (२६) या तरु णाच्या अंगावर सोमवारी झाड पडून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शहरात आता खड्ड्यांपाठोपाठ वृक्षांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.गेल्या वर्षी अंगावर झाड पडून अ‍ॅड. किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता, अशाच प्रकारची घटना असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ठाण्यात खड्ड्यांबरोबरच आता धोकादायक झाडांची समस्यादेखील गंभीर झाली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मागील वर्षी मुलीला शाळेत सोडून परत घरी येणाऱ्या अ‍ॅड. पवार यांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अखेर, त्यांच्या पत्नीला ठाणे महापालिकेत नोकरी दिल्यानंतर हे प्रकरण निवळले होते. साकेत येथे राहणारा प्रशांत काही कामानिमित्त पाचपाखाडी परिसरात आला होता. जनसेवा बँकेजवळून बाइकवरून जात असताना एक मोठे झाड त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या बाइकचेदेखील मोठे नुकसान झाले. त्याला तत्काळ कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शहरात झाडे पाडण्याचे प्रमाण वाढले असून वृक्ष प्राधिकरण मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.>८९ झाडे कोसळलीगेल्या १५ दिवसांत ८९ झाडे पडली आहेत. सोमवारच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये धोकादायक झाडांबाबत भीती निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आवश्यक असताना ठाण्यात आजही ५० धोकादायक झाडे तशीच उभी आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेच ही माहिती दिली आहे. या विभागाकडे रोजच तशा तक्र ारी येत आहेत.