ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदार कार्या लयातील मिळून तब्बल पाच तहसीलदार आणि तीन नायब तहसीलदार आदी पाच अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी आणि गुरूवार या दाेन िदवसांच्याक कालावधीत पार पडल्या आहेत. या अचानक झालेल्या बदल्यामुळे कर्मचारी वर्गा त तर्क वितर्क काढले जात आहे.
राजकीय वर्तुळात आधीच वेगवेगळ्या घडामाेडी घडत आहे. त्यात निवडणुका डाेक्यावर गाेंगावत असताना तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्या लयात तर्कवितर्क काढले जात आहे. दरम्यान दाेन दिवसांपूवीर्च ठाणे तहसीलदार कायार्लयातील नायब तहसीलदार यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेतील संबंधीत नायब तहसीलदार वासुदेव पवार यांच्या या कार्या लयाच्या सेतू विभागात बदली झाली आहे. ते आधी निवासी नायब तहसीलदार म्हणून कर्तव्य बजावत हाेते. उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांची ठाणे तहसीलदार कार्यर्लयात बदली झाली. यानंतर रत्नागिरीच्या मंडणगड येथील दत्तात्रय बेर्डे यांची ठाणे येथील संजय गांधी याेजनेसाठी पदस्थापना झाली. येथील मनाेजकुमार सुवेर् यांची करमणूक कर विभागाच्या नायबतहसीलदार पदी बदली करण्यात आलेली आहे.
या नायब तहसीलदारांच्या बदल्यांसह तहसीलदारां पाच बदल्याही झालेल्या आहेत. यामध्ये जिल्हाधिाकरी कायार्लयातील तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्या जागी कुर्ला -२ या येथील रेवण लेंभे यांची बदली झाली. तर वांद्रे येथील आसावरी संसारे यांची बदली ठाणे येथील वृषाली पाटील यांच्या जागी झाली. तर पाटील यांची बदली निवडणूक शाखेचे तहसीलदार नागाेराव लाेखंडे यांच्या जागी झाली आहे. तर लाेखंडे यांनी बदली मुंबई उपनगर निवडणूक शाखेत झाली. येथील तहसीलदार मिलिंद पुंडे यांची बदली ठाणे जिल्हाधिाकरी कायार्लयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. पुरवठा विभागाचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय नन्नावर-पाटील यांची बदली पालघर जिल्हाधिकारी कार्यर्लयात झाली आहे.