शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 06, 2023 5:32 PM

Thane: समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - आमच्या शांतीवन आश्रमात जेव्हा नुकताच जन्मलेल्या बाळाला घेऊन मुली येतात...आमच्याकडे बाळाला सोपवून पळुन जाण्याचा प्रयत्न करतात.. अंधारात लपून बसतात...कधीकधी बेवारस बाळ सापडतात. तेव्हा वाटतं की, आई वर लिहिलेल्या मराठी साहित्यातील सगळ्या कविता पाण्यात बूडवून टाकाव्यात... असे भावविभोर अनुभव कथन करता- करता बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे हळवे होतात. ते समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'विचारमंथन' व्याख्यानमालेचे नववे पुष्प 'वेगवेगळया सामाजिक आणि परिस्थितीमधील विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे अनुभव, सध्याची शिक्षण स्थिती आणि नागरिक घडविण्याच्या प्रवासातील शिक्षकांचे योगदान' या विषयावर मान्यवरांनी गुंफले. या परिसंवात वंचित, निराधार, बेघर लेकारांचे संगोपन शिक्षण यासाठी कार्य करणारे बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक नागरगोजे, ठाण्यातील सिग्नल शाळेच्या प्रकल्प्रमुख आरती परब, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या उपप्राचार्या ग्लॅडिज कॉब्राल, बालहक्क, शिक्षण या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार यामिनी सप्रे सहभागी झाले होते. या मान्यवरांची मुलाखत आकाशवाणीचे वृत्तनिवेदक राजेंद्र पाटणकर यांनी घेतली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथबुके देवून करण्यात आला.

ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न समजून घेतला, ऊसतोडीसाठी मुलांना शिक्षण सोडावे लागते. ऊसतोड मजुरांच्या वेदना असंख्य आहेत, त्या जाणून घेतल्या. ऊसतोडीवर गेलेल्या बाईच्या आणि लेकरांच्या लैंगिक शेषणाच्या कित्येक घटना या दडपून टाकल्‌या जात असल्याचं लक्षात आले. अशा कित्येक घटनांना वाचा फोडण्याचे काम शांतिवनच्या माध्यमातून हाती घेतले. पंधरा वर्षाच्या आत आई होवून विधवा झालेल्या मुली एकटीने जगण्याचा संघर्ष करताना भेटल्या. परिस्थितीमुळे मुलीची जबाबदारी घ्यायला नको म्हणून जन्माला येण्याअगोदारच त्यांना खुडून टाकणाऱ्या हतबल माताही दिसल्या. मुन सुन्न करणारे भयाण वास्तव पाहिले असल्याचे  नागरगोजे यांनी नमूद केले. या शोषित कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारमध्ये बसलेल्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही तर कितीतरी जबाबदार घटकांनी या प्रश्नाला सोईस्कररित्या बाजूला ठेवले असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली अर्थव्यवस्था ८० टक्के कृषीवर अवलंबून आहे, असे असताना गडचिरोलीपासून मुंबईपर्यत किंवा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यतच्या प्राथमिक शिक्षण विभागात कृषी हा विषय शिकवला जात नाही. शेती करा असे सांगतो आणि शेतीचे शिक्षण देत नाही. शेतीवर शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था नसल्याचे त्यांनी नमूद केली. यासाठी शांतीवनमध्ये जैन एरिगेशन यांच्या सहयोगाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवतो, आज ही मुले चांगल्या पध्दतीने शेती करण्याचे शिक्षण घेतात. १५ वर्षापूर्वी आमचा हा प्रयोग शासनानेही स्वीकारली असून शासनानेही प्रगतीवर्ग सुरु केले असल्याचे दीपक नागरगोजे यांनी नमूद केले. मुलांवर संस्कार करणारे सर्वोत्तम साहित्य सानेगुरूजीचे असून ते मुलांना चांगल्या पध्दतीने समजते असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेTeachers Dayशिक्षक दिन