Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास
By जितेंद्र कालेकर | Published: August 9, 2023 11:07 PM2023-08-09T23:07:51+5:302023-08-09T23:08:20+5:30
Ajit Pawar: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले. तसेच शरद पवार हेच आमचे आदर्श असून, त्यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जावेत, लोकांची मते, विचार, तक्रारी, सोडविण्याचे ठिकाण बनायला हवे. ते संवादाचे केंद्र व्हायला व्हावे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बदनामी हाेईल, असे काेणीही काम करु नका. सत्तेच्या माध्यमातून विकास साधता येताे, त्यामुळेच अापण हा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीचा कार्यकतार् आधार बनला पाहिजे, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला. देश एकसंघ ठेवूनच काम करावे लागेल. जातीय सलाेखा ठेवला तरच िवकास हाेताे. नवीन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना स्वतंत्र केबिन, पत्रकार परिषद, पक्षाच्या बैठकीसाठी जागा असे प्रशस्त कार्यालय प्रथमच उभारण्यात आले आहे. हे कार्यालय जनतेसाठी खुले असायला हवे. एसआरए प्रोजेक्टमध्ये गरिबांना घरे दिली जातील, युवकांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न राहील. यातून शहराचा, राज्याचा, देशाचा विकास व्हावा, यासाठी सत्तेचा उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद पराजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे महिला अध्यक्ष वनिताताई गोतपगार, ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद (वीरू) आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.