शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

By जितेंद्र कालेकर | Published: August 09, 2023 11:07 PM

Ajit Pawar: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले.

- जितेंद्र कालेकर ठाणे  - ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले. तसेच शरद पवार हेच आमचे आदर्श असून, त्यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जावेत, लोकांची मते, विचार, तक्रारी, सोडविण्याचे ठिकाण बनायला हवे. ते संवादाचे केंद्र व्हायला व्हावे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  बदनामी हाेईल, असे काेणीही काम करु नका. सत्तेच्या माध्यमातून विकास साधता येताे, त्यामुळेच अापण हा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीचा कार्यकतार् आधार बनला पाहिजे, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला. देश एकसंघ ठेवूनच काम करावे लागेल. जातीय सलाेखा ठेवला तरच िवकास हाेताे. नवीन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना स्वतंत्र केबिन, पत्रकार परिषद, पक्षाच्या बैठकीसाठी जागा असे प्रशस्त कार्यालय प्रथमच उभारण्यात आले आहे. हे कार्यालय जनतेसाठी खुले असायला हवे. एसआरए प्रोजेक्टमध्ये गरिबांना घरे दिली जातील, युवकांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न राहील. यातून शहराचा, राज्याचा, देशाचा विकास व्हावा, यासाठी सत्तेचा उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद पराजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे महिला अध्यक्ष वनिताताई गोतपगार, ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद (वीरू) आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे