ठाणे: मुंबई, ठाण्यासह तीन जिल्हयातून हद्दपार केलेल्या सचिन प्रभाकर जाधव (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विराेधी पथकाने ठाण्यातील वागळे इस्टेट भागातून बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन याच्याविरुद्ध हाणामारीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात दाखले झाले हाेते. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना अटकाव करण्यासाठी वागळे इस्टेट परिमंडळाचे तत्कालीन पाेलिस उपायुक्त डाॅ. विनय राठाेड यांनी त्याला १२ ऑक्टाेंबर २०२१ राेजी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या तीन जिल्हयातून दाेन वषार्र्साठी हद्दपार करण्याचे आदेश दिले हाेते. तरीही या आदेशाचा भंग करुन ताे बेकायदेशीरपणे फिरत असल्याची माहिती खंडणी विराेधी पथकाला मिळाली हाेती.
त्याच आधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मालाेजी शिंदे यांच्या पथकाने १६ ऑगस्ट २०२३ राेजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, ज्ञानेश्वर नगर भागातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरूध्द महाराष्ट्र पाेलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.