शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

ठाण्यात महिलांना देहविक्रीस लावणा-या तिघांना अटक; पीडित दोघींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 8:03 PM

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घोडबंदर रोडवरील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग या हॉटेलमध्ये ...

ठळक मुद्दे फरार चौघांचा शोध सुरूहॉटेलमध्ये वेटरद्वारे मोबाइल फोन करून बोलवत

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घोडबंदर रोडवरील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग या हॉटेलमध्ये तेथील वेटरद्वारे मोबाइल फोन करून आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन महिलांना पैशांचे आमिष दाखवून लॉजवर बोलवण्यात येते. तसेच त्यांना त्याच लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी महिलेची मागणी करणा-या ग्राहकांकडून पैसे घेऊन देहविक्री करण्यासाठी पाठवणाºया अटकेतील महेश रामधनी यादव (५०), योगेश विश्वनाथ शेट्टी (३३) आणि युगेश्वरकुमार ऊर्फ सुनील वकील यादव (२१) तसेच फरार शंकर पितांबर यादव, जयराम शेट्टी आणि महेश शेट्टी व राधेश्याम यादव अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवार, २४ जानेवारीला रात्री घोडबंदर रोडवरील ओवळानाका परिसरात करण्यात आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा