- पंकज पाटील बदलापूर - बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. बदलापुरात घडलेला चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलन करणार्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले. प्रवाशांचा संताप पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनी ही माघार घेत सुरक्षित स्थान गाठले. बदलापूरकरांचा हा रौद्ररूप पाहून पोलीस देखील स्तब्ध झाले.
आदर्श महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करून पोलीस प्रशासनाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र संतप्त झालेल्या पालकांनी महाविद्यालयाच्या आंदोलनाच्या ठिकाणी काढता पाय घेत रेल्वे स्थानक गाठत बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलन कर्त्यांनी रोखून धरली.