लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रात्री उशिरापर्यंत चालणा-या वर्तकनगर, उपवन परिसरातील एका लेडिज बारवरठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षासह वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईमध्ये बारमालकासह ५८ जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उपवन परिसरातील ‘सूरसंगीत’ हा बार नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असून बारमधील महिला वेटर्स या तोकड्या कपड्यांमध्ये बीभत्स चाळे करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. त्याआधारे २६ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वा.च्या सुमारास या बारवर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी बारमध्ये सहा बारबाला तोकड्या कपड्यांमध्ये अंगविक्षेप करताना आढळल्या. अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यासह उशिरा बार सुरू ठेवून नियमांचा भंग करणारा बारमालक प्रकाश शेट्टी, बारचा व्यवस्थापक गणेश दास, १३ वेटर, १९ गि-हाईक, सहा कर्मचारी, पाच वादक आणि दोन चालक आदी ५८ जणांना अटक करण्यात आली. हॉटेलमधील काऊंटरवरील एक लाख ९७ हजारांच्या रोकडसह चार लाख ५५ हजारांची रोकड याठिकाणाहून हस्तगत करण्यात आली. या सर्वांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील बारवरील कारवाईत बारबालांसह ५८ जणांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: November 26, 2018 8:17 PM
पहाटे १.३० वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची मुभा असतांनाही त्याहीपेक्षा उशिरापर्यंत बार चालू ठेवणाऱ्या बार मालक आणि व्यवस्थापकासह तोकडया कपडयांमध्ये अश्लील बिभत्स वर्तन करणा-या बारबालांनाही ठाणे पोलिसांनी उपवन येथील एका बारमधून सोमवारी पहाटे अटक केली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईबारमालकासह गि-हाईकांनाही अटकसाडे चार लाखांची रोकडही जप्त