शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

निवडणूक खर्चात ठाण्याची मुंबईवर मात

By admin | Published: January 24, 2017 5:41 AM

ठाणे आणि मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक

ठाणे : ठाणे आणि मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चासाठी मुंबईतील उमेदवारांसाठी प्रत्येकी पाच लाख आणि ठाण्यातील उमेदवारांसाठी चार लाख रुपयांचे बंधन घातले आहे. ठाण्यातील निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने लढवली जात असल्याने ठाण्यातील पक्षांना या खर्चाचा मोठा वाटा उचलावा लागणार आहे. मुंबईतील पक्ष-अपक्षांना एका प्रभागासाठी पाच आणि ठाण्यातील पक्ष-अपक्षांना एका प्रभागासाठी १६ लाख रु पये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे खर्चाबाबतीत देशाच्या आर्थिक राजधानीला ठाणे मागे टाकणार आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांमध्ये २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. २३ फेब्रुवारीला निकाल लागेल. राज्य निवडणूक आयुक्तांनी ११ जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या अ गटातील प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाचे बंधन घातले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाच लाख रुपयांचे बंधन असणार आहे, तर ठाण्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी प्रत्येकी चार लाख रुपये असणार आहे. मात्र प्रभागांची वेगळी रचना यंदा खर्च वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे. (प्रतिनिधी)