ठाणे : शहरातील घोडबंदर मार्गासह मुंबई नाशिक महामार्ग, महापे-शीळ-कल्याण रोडसह भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक सोमवारी सकाळसह सायंकाळी वाहतूककोंडीत अडकल्याचे चित्र होते. यातून शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूलबसही सुटल्या नाहीत.मुलुंड टोलनाका ते घोडबंदर रोडवरील गायमुख या शेवटच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत सकाळी ८ ते १० आणि दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या. असेच चित्र भिवंडीतील मानकोली-राजनोली, वासिंद, शहापूर कसारा पट्ट्यात होते. खड्ड्यांमुळे जणू संपूर्ण जिल्हा कोंडीत अडकला होता. ठाणेमार्गे नाशिकसह गुजरात, पालघर, बोरीवलीकडे आणि ठाण्यातून मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणारी वाहनेही या कोंडीत अडकली होती. दुपारी शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळा असल्यामुळे स्कूलबसही कोंडीत अडकल्या.
खड्ड्यांमुळे ठाण्याची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:45 AM