- प्रज्ञा म्हात्रेठाणे - महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टीपीएल मुख्यमंत्री चषक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचे अ आणि ब संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी लढत देतील. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत स्पर्धेच्या निर्णायक फेरीत स्थान स्थान मिळवले. अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या अ संघाने एसआरए ग्रुपवर ५ विकेट्सनी सरशी मिळवत ब संघासमोर आव्हान उभे केले.
पहिल्या लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या अ संघातील गोलंदाजानी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला १८.४ षटकात १२८ धावांवर रोखले.प्रसाद पवारने संघाच्या धावसंख्येत ५१ धावांच्या अर्धशतकी खेळीचे योगदान दिले. परिक्षित वळसंगकरने ३७ आणि सुमित दवाणीने २३ धावा केल्या. अतुल सिंगने १७ धावांत ३ विकेट्स मिळवून प्रतिस्पर्धी संघाला मर्यादित धावसंख्येवर रोखले. हेमंत बुचडे आणि सिद्धांत सिंगने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने १९.२ षटकात ५ बाद १३० धावा करत निर्णायक लढतीत स्थान मिळवले. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाची डळमळीत सुरुवात झाली. पण कर्णधार चिन्मय सुतार आणि धृमिल मटकरने ६८ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
चिन्मयने नाबाद ४५ , धृमिलने ३५ आणि अर्जुन शेट्टीने १६ धावांची खेळी केली. प्रथमेश महाले आणि भाविन दर्जीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अन्य लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या अ संघासमोर एसआरएस ग्रुपने २० षटकात ८ बाद १८० धावांचे आव्हान उभे केले. त्यात सागर मिश्राच्या ५५, सचिन यादव (३५), आनंद बैस (२७) आणि आकाश पारकरने २५ धावांचे योगदान दिले. निपुण पांचाळने ३२ धावांत ३, विनायक भोईर, विद्याधर कामत आणि शशिकांत कामतने प्रत्येकी एक विकेट मिळवली. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाने १९.५ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १८४ धावांसह विजयाचे लक्ष्य पार केले. अखिल हेरवाडकरने ७७, शशिकांत कदमने नाबाद ३४, सिध्दांत अधटरावने ३४ धावा करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. सक्षम झा, आकाश पारकर आणि वैभव माळीने प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : १८.४ षटकात सर्वबाद १२८ (प्रसाद पवार ५१,-परिक्षित वळसंगकर ३७, सुमित दवानी २३, अतुल सिंग २.४- १-१७-३, हेमंत बुचडे ४-१९-२, सिद्धांत सिंग १-३-२) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) : १९.२ षटकात ५ बाद १३०(चिन्मय सुतार नाबाद ४५, धृमिल मटकर ३५, अर्जुन शेट्टी १६, प्रथमेश महाले २.२-१५-२, भाविन दर्जी ४-२६-२).एसआरएस ग्रुप : २० षटकात ८ बाद १८०(सागर मिश्रा ५५, सचिन यादव ३५, आनंद बैस २७,;आकाश पारकर २५, निपुण पांचाळ ३-३२-३, विनायक भोईर ४-३१-१, विद्याधर कामत ३-१६-१, शशिकांत कदम २-२०-१) पराभूत विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : १९.५ षटकात ५ बाद १८४ (अखिल हेरवाडकर ७७, शशिकांत कदम नाबाद ३४, सिध्दांत अधटराव ३४, सक्षम झा ३-३८-१, आकाश पारकर ४-५२-१, वैभव माळी ३.५-२७-१).