ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतिय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी मंगळवारी कार्यालयाबाहेर दुपारी निदर्शने केली. यामध्ये त्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करा, पाच दिवसांचा आठवडा विनाविलंब सुरु करा आदी मागण्या केल्या.राज्य सरकारी कर्मचारी संघटना व महारासष्ट्र राज्य कोकण विभाग जिल्हा शाखा ठाणे आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली कर्मचा-यांनी ही निदर्शने केले
यावेळी कर्मचारी वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता. यामध्ये महिला वर्गाची संख्य अधिक आढळून आली.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करा, अनुकंपा भरती विनाविलंब सुरु करा, निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या एका वारसाला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्त करा तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करा आदी मागण्यांसाठी यावेळी कर्मचा-यांनी निदर्शने केली.