ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर सातबारा मिळविण्यासाठी किआॅस्को मशीन बसविली आहे. मात्र, ती मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे आॅनलाइन सातबारा घेण्यासाठी येणाºया नागरिकांना निराश होऊन खालीहात परतावे लागत आहे. तर, सेतू कार्यालयात बसवलेल्या फाइल ट्रॅकिंगच्या दोन्ही मशीनही बंद असल्याचे समोर आले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेलाच या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून जिल्हा प्रशासनाने हरताळ फासल्याचे दिसत आहे.
सध्याचे युग हे हायटेक युग म्हणून ओळखले जात आहे. त्यात सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल होत आहे. त्यानुसार, महसूल विभागानेही आॅनलाइन पद्धतीचा अवलंब करीत राज्यभरातील कोणताही सातबारा संबंधित शेतकऱ्यांस आॅनलाइन मिळवता यावा, यासाठी सातबारा संगणकीकरणाचे कामदेखील वेगाने सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामार्फत आॅनलाइन सेवा देण्यात येत आहे. त्यात आपले सरकारच्या ई-महाभूमी उपक्र माखाली आॅनलाइन सातबारे शेतकºयांना उपलब्ध होत आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर किआॅस्को मशीन बसविली आहे. या मशीनद्वारे केवळ २३ रुपयांमध्ये शेतकºयांना अवघ्या काही मिनिटांतच सातबारा प्राप्त होत आहे. त्यामुळे सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मशीन बंद आहे.फाइल ट्रॅकिंग मशीनही बंदसेतू कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर व पहिल्या मजल्यावर फाइल ट्रॅकिंगसह शासकीय माहिती मिळविण्यासाठी व शासनाच्या इतर वेबसाइटची माहिती देणारे मशीनदेखील मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे विविध प्रकल्पांच्या फाईल नेमक्या कुठे आहेत, हे शोधणे अशिलांना कठिण होऊन बसले असून जिल्हाधिकारी कार्यालयांतील कथीत दलालांची मात्र, यामुळे चांदी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळेच प्रशासन हे ट्रॅकिंग मशीनसह किआॅस्क दुरुस्तीकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.शेतकºयांना बसतोय नाहक भुर्दंडज्या शेतकºयांची स्थानिक तहसील कार्यालयाकडून अडवणूक करण्यात येते, त्यातील बहुसंख्य जण जिल्हाधिकारी असलेल्या या किआॅस्कमध्ये सातबाराचे उतारे घेण्यासाठी येत असतात. मात्र, ते बंद असल्याने दूरवरून भाडे खर्चुन येऊनही त्यांना खाली हात परतावे लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुुर्दंड बसत आहे.