ठाणे : आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत. महिनाकाठी जमतेम एक ते दीड कोटीच्या आसपास उत्पन्न येत असतांना खर्च मात्र तिप्पट होत आहे. त्यामुळे खाजगी ठेकेदाराचे पैसे देखील टप्याटप्याने दिले जात आहेत. तर डिङोल आणि सीएनजीपोटीच तीन ते चार कोटींचा खर्च होत आहे. त्यात पालिकेकडून येणाऱ्या अनुदानातूनच सध्या येथील कर्मचाऱ्यांचा पगार निघत आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० हून अधिक बसेस आहे. यातील २९० बसेस या खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून रस्त्यावर धावत आहे. त्यातून लॉकडाऊनपूर्वी परिवहनचे उत्पन्न हे २३ ते २७ लाखांच्या घरात प्रतीदीन गेले होते. परंतु पहिल्या आणि दुस:या लॉकडाऊनमुळे परिवहनचा गाडा चिखलात रुतला असून तो बाहेर काढणो आता कठीण होत चालले असल्याचे चित्र आहे. दुसरा लॉकडाऊन पडण्याच्या आधी परिवहनच्या २३० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यातून परिवहनला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. एक लाखाच्या आसपास प्रवासी रोज बसेसमधून प्रवास करीत होते.दरम्यान आता कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यामुळे परिवहन सेवेला देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. परिवहनच्या सध्या १८० च्या आसपास बसेस रस्त्यावर उतरल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातून केवळ एका एका सीटवर एक प्रवासी असल्याने रोज परिवहनमधून ४० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. त्यातून परिवहनला केवळ ६ लाखांच्या आसपासच उत्पन्न मिळत असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रंनी दिली. त्यामुळे महिन्याला १ ते दिड कोटींच्या आसपासच उत्पन्न मिळतांना दिसत आहे. त्यातून परिवहनचा गाडा कसा हाकायचा असा पेच परिवहन प्रशासनाला सतावू लागला आहे. पालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी येणा:या अनुदानातूनच कर्मचा:यांचा कसाबसा पगार निघत आहे. परंतु बसेस दुरुस्ती होत नाही, टायर बदलण्यासाठी पैसे नसल्याने बसेस आगारात धुळ खात पडून आहेत.
व्होल्वोच्या केवळ ९ बसेस रस्त्यावर उतरविण्याची तयारी परिवहनने केली आहे. परंतु उर्वरीत २१ बसेस बंद आहेत. सीएनजी, डिङोल यासाठी महिनाकाठी १ कोटींच्या आसपास खर्च जात आहे. जीसीसीचे पेमेंट पाच ते सहा कोटी द्यावे लागत आहे. त्यातून आता ५० टक्यांच्या आसपास दिले जात आहे. परंतु आता त्यांचे पमेंट देखील थांबविण्यात आले आहे. एकूणच उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने बसेसचा मेटेन्सन देखील होत नसल्याचे दिसत आहे.