शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाण्याचे नगरसेवक कल्याणमध्ये; शिवसेनेत कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:18 IST

प्रचाराचे नियोजन कोलमडले

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात अधिक सक्रिय असल्याची ठाण्यात कुजबुज सुरू झाली आहे. यामुळे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हेही दबावाखाली आले आहेत. त्याचवेळी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये शिस्तबद्ध प्रचार सुरू आहे. शिवसेनेच्या प्रचारात नियोजनाचा अभाव असल्याचे दिसत आहे. रॅलीची वेळ कार्यकर्त्यांना धड कळत नाही. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची शोधाशोध सुरू आहे, असे सेनेतील मंडळींनीच सांगितले.ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राजन विचारे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना वरचढ ठरली आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक सहज जिंकू, असा आत्मविश्वास ठाण्यातील शिवसैनिकांना वाटू लागला आहे. त्यामुळे प्रचार तरी कशाला करायचा, असा प्रश्न काही शिवसैनिकांना पडला आहे. या आत्मविश्वासामुळेच की काय, प्रचार रॅली काढण्याचे नियोजन आदल्या दिवशी ठरत नसल्याने प्रचार कसा व कुठे करायचा, या बुचकळ्यात शिवसैनिक पडले. विचारे यांच्या आक्रमक शैलीमुळे काही शिवसैनिक त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. त्यामुळे काही नगरसेवक, पदाधिकारी हे कल्याणमध्ये डॉ. शिंदे यांच्या नियोजनबद्ध प्रचारात सहभागी होणे पसंत करत आहेत. शिवाय, श्रीकांत यांची पाठराखण केली, तर पालकमंत्री एकनाथ शिंदे खूश होतील व भविष्यात फायदा होईल असे त्यांना वाटत आहे. शिवाय, तुम्ही ठाण्यातील नगरसेवक, पदाधिकारी आहात, तर तेथे प्रचार करा, असे सांगायला शिंदे यांचीही जीभ रेटत नाही.शिवसेनेकडून पलटवार नाहीराष्टÑवादीकडून आरोप होत असताना शिवसेनेकडून कोणत्याही स्वरूपाचा पलटवार होताना दिसत नाही. त्यामुळे प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अटीतटीची झाल्याची चर्चा दबक्या आवाजात शिवसैनिकांत आहे. आम्हाला अतिआत्मविश्वास त्रासदायक ठरू शकतो, असे मत एका ज्येष्ठ शिवसैनिकाने व्यक्त केले. येत्या काही दिवसात याच मुद्द्यावर शिवसैनिक तसेच अन्य पक्षांमध्ये चर्चेला ऊत येणार असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkalyan-pcकल्याणthane-pcठाणेShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019