भिवंडी : शहरातील रोशनबाग टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात मिळालेल्या चार वर्षाच्या बालिकेच्या कुजलेल्या मृतदेहाने शहरात खळबळ माजली होती. या बालिकेवर अत्याचार करून तीला जीवे ठार मारणाऱ्या नराधमास ठाणे कोर्टाने वर्षाच्या आत सुनावणी घेऊन शुक्रवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना झाल्यानंतर स्थानिक महिलांनी मोर्चा काढला होता.जागतीक महिला दिनाच्या दिवशी ठाणे कोर्टाने हा निर्णय देऊन ‘निर्भया’ला न्याय दिल्याची भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली.मागील वर्षी १ एप्रिल २०१८ रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात चार वर्षाची बालिकेस फूस लावून पळविल्याची तक्रार तीच्या वडीलांनी दाखल केली होती. ४ एप्रिल रोजी रोशनबाग येथील टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात दुर्गंधी सुटल्याने पहाण्यास गेलेल्या नागरिकांना व पोलीसांना सदर बालिकेचा मृतदेह सापडला. या दरम्यान आरोपी तेथेच वावरत होता. परंतू पोलीसांनी कसून चौकशी सुरू केली असता बालिकेच्या शेजारी रहाणारा आरोपी मोहम्मद आबेद मो. आजमीर शेख (२०) हा बिहार येथील त्याच्या मुळगावी पळून गेला. भोईवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मायने यांनी तीन पथके नेमुन त्यास बिहार येथून अटक केली. बालिकेच्या वडीलांचे रोशनबागेच्या परिसरांत पानाची टपरी होती. त्या टपरीमधून घेतलेल्या उधार सामानाचे पैसे मोहम्मद आबेद यांच्याकडून मागीतले असता त्याला राग आला.त्या रागातून त्याने पानपट्टी मालकाच्या चार वर्षाच्या मुलीला घरांत नेऊन तिच्यावर अत्याचार करीत तीची निर्घुण हत्या केल्याची कबुली त्याने पोलीसांना दिली. या घटनेनंतर आरोपीला फाशी द्यावी आणि निर्भयाला न्याय द्यावा या मागणी करीता स्थानिक महिलांनी शहरात मोर्चा काढला होता.सबळ पुरावे गोळा केल्यानंतर पोलीसांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयांत ६ जुलै २०१८ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते.या गंभीर गुन्ह्याचा वादविवाद न्यायाधिश एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयांत सुरू होता. आरोपी व सरकारी बाजू तपासून न्यायाधिश सिन्हा यांनी शुक्रवार रोजी आरोपी मोहम्मद आबेद शेख यांस फाशीची शिक्षा सुनावली. जागतिक महिला दिनाच्या दिवशी न्यायालयाने हा निर्णय देऊन भिवंडीतील ‘निर्भया’स न्याय दिल्याची भावना स्थानिक महिलांमध्ये निर्माण झाली असून महिला संघटनांनी पोलीस दलाचे आभार मानले आहे.
जागतीक महिला दिनाच्या दिवशी ठाणे कोर्टाने नराधमास सुनावली फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:05 PM
भिवंडी : शहरातील रोशनबाग टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात मिळालेल्या चार वर्षाच्या बालिकेच्या कुजलेल्या मृतदेहाने शहरात खळबळ माजली होती. या बालिकेवर ...
ठळक मुद्देउधार सामानाचे पैसे मागीतल्याने आरोपीस आला रागदुकानदाराच्या चार वर्षाच्या बालीकेची घरांत केली हत्यामहिला दिनी ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली फाशी