शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध ठाणे न्यायालयाचे अटक वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:17 PM

मारहाणीच्या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट ठाणे न्यायालयाने जारी केले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती दोन वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल तिच्याविरुद्ध वॉरंट तसेच एक हजारांचा दंडही भरण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण झाल्याचा आरोपएक हजाराचा दंड ठोठावलासुनावणीसाठी न्यायालयात दोन वेळा अनुपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याच्या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट ठाणेन्यायालयाने जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती दोन वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल तिच्याविरुद्ध वॉरंट तसेच एक हजारांचा दंडही भरण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली.ठोशाबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा आरोप मनचंदा हिने केल्यानंतर प्राजक्ताविरुद्ध ५ एप्रिल रोजी ठाणे ग्रामीणमधील काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनचंदा यांनी माळी हिच्याविरु द्ध ठाणे न्यायालयात तक्र ार दाखल केली होती. न्यायालयाने तक्र ार दाखल करून घेतली. शिवाय धमकीचेही कलम वाढविल्यामुळे प्राजक्ताच्या अडचणीत भर पडली. न्यायालयाने २६ जून रोजी समन्स बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश तिला बजावले होते. समन्स घेऊन तिच्या घरी गेलेल्या पोलिसांनाही ती किंवा तिच्या घरातील कोणीही मिळाले नव्हते. जून महिन्यात याप्रकरणी न्यायाधीश व्ही.व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मात्र, प्राजक्ताने सुनावणीसाठी हजेरी न लावल्याने न्यायालयाने तिच्याविरुद्ध १ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक वॉरंट जारी करून तिला एक हजारांचा दंडही ठोठावला. यासंदर्भातील एक सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयात होती. त्यावेळी मनचंदा हिचे वकील सचिन पवार यांनी ही माहिती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. बहाळकर यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भातील कोणतेही आदेश अद्याप आपल्यापर्यंत आलेले नाहीत. मात्र, न्यायालयीन नेमके काय आदेश आहेत, ते पाहून चौकशी केली जाईल, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय