लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येऊर गावातील एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी रात्री छापा टाकून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड तसेच जुगाराची सामुग्री असा एक लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील येऊर गावात तीन पत्ते जुगार सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस शिपाई नीलम पाचपुते यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, अविराज कु-हाडे, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड आदींच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास येऊर गावातील हवेली हॉटेलच्या जवळील एका घरात छापा टाकून तीन पत्ते जुगार अड्डा चालविणारा तरफीन सनी तसेच जुगार खेळणाºया सचिन पाटील आणि राजकुमार चव्हाण यांच्यासह ११ जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येऊर येथील जुगाराच्या अड्डयावर ठाणे गुन्हे शाखेची धाड: ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 7:09 PM
येऊर गावात तीन पत्ते जुगार सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी याठिकाणी धाड टाकून ११ जणांना अटक केली.
ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलएका घरात सुरु होता तीन पत्ते जुगारएक लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत